औषधी गोळीतून पत्नीला ब्लेड खाऊ घातले, पतीला अटक

0

 

(Pune)पुणे: कौटुंबिक वादातून औषधी गोळीतून पत्नीला ब्लेड खाऊ घालून तिची हत्या करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पुण्यातील उत्तम नगर येथे ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत छाया सोमनाथ सपकाळ (वय ४२) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमनाथ पत्नी छाया हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे तो तिच्याशी कायम वाद घालून तिला मारहाण करून तिचा छळ करत होता. या वादातूनच त्याने तिला जीवे मारण्याची योजना आखली. त्याने औषधी गोळ्यांमध्ये ब्लेडचे तुकडे टाकून त्या गोळ्या तिला खायला दिल्या. ब्लेड गिळाल्याने त्रास सुरु झाला. हा प्रकार लक्षात आल्यावर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सोमनाथला अटक करण्यात आली आहे.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा