बाळासाहेबांचे स्मारक म्हणून ‘मातोश्री’ खुला करा-भाजप

0

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वास्तव्य राहिलेला मातोश्री बंगला जनतेसाठी त्यांचे स्मारक म्हणून खुला करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार राम कदम यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. (Shiv Sena Supremo Balasaheb Thackeray Death Anniversary)
आमदार कदम यांनी नमूद केलेय की, बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले, तेच त्यांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार? असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या राहायला मातोश्री-२ वर गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. त्यांनी अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात घेतले, दिवस रात्र त्यांचा ज्याठिकाणी वावर होता, तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही? असा सवाल त्यांनी केलाय.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा