आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल

0

मुंबई : मुंबई लोअर परळ येथे पुलाचे काम अपूर्ण असतानाच त्याच्या दुसऱ्या मार्गिकेचे जबरदस्तीने उद्घाटन केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aditiya Thackeray Booked)
दुसऱ्या मार्गिकेची चाचणी झाली नसतानाही आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी आदित्य ठाकरेविरोधात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा