कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात

0

नवी दिल्ली NEW DELHI  : कमर्शियल एलपीजी LPG सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी नवे दर जाहीर केले असून त्यात दर कमी करण्यात आले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरात ७८ रुपयांची कपात झाली आहे. यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांना किरकोळ प्रमाणात का होईना पण दिलासा मिळणार आहे. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Commercial LPG Gas Cylinders Price Hike) किंमतीत कपात करण्यात आली आहे.
याआधी तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर २०९ रुपयांनी वाढले होते. तेल वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या नवीन किमती जाहीर करतात. राजधानी दिल्लीमध्ये 1 नोव्हेंबर 2023 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1833.00 रुपये होती, ही किंमत 1755.50 रुपयांवर आली आहे.

घरगुती सिलिंडरचे काय?

केंद्र सरकारने महिन्याभरापूर्वी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत २०० रुपयांची कपात करत दिलासा दिला होता. पण, आज घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नसून ती कायम आहे. १४.२० किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर दिल्लीत ९०३ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा