वांद्रे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, ८ जण जखमी

0

bandra gas cylinder blast news maharashtra

मुंबई, १८ नोव्हेंबर, वांद्रे येथील गजधर डॅम रोडवरील फिटर गल्लीमध्ये सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे.

निखिल जोगेश दास (५३), राकेश रामजनम शर्मा (३८), अँटोनी पॉल थेंगल (६५), कालीचरण मजीलाल कन्नौजिया (५४) आणि शान अली झाकीर अली सिद्दीकी (३१), समशेर (५०), संगीता (३२) आणि सीता (४५) अशी जखमींची नावे आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा