
नागपूर – रामटेक लोकसभा मतदारसंघात नरखेड तालुक्यातील जलालखेड़ा येथे खासदार कृपाल तुमाने यांच्यातर्फे मोफत नेत्र तपासणी व गरजूना मोफत चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले,. माँ नर्मदा सभागृहात आयोजित मोफत आरोग्य निदान महाशिबिराला परिसरातील गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रारंभी अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी झालेल्या या आरोग्य शिबिरात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.
नेत्रतज्ञामार्फत रोगांचे निदान केल्या गेले. यानंतर मोफत चष्मे वाटप करण्यात आले. ज्यांना डोळ्याचें ऑपरेशन्स डॉक्टर्सनी सांगितले त्यांना मोफत ऑपरेशन करण्याकरीता वेळ देण्यात आली. यानंतर त्यांना नागपूर येथील हॉस्पिटलमधे शस्त्रक्रिया करण्याकरिता नेण्याची व परत आणण्याची व्यवस्था खा तुमाने यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इंटकेलवार, रामटेक लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख चंद्रहासजी राऊत रामटेक लोकसभेचे युवासेना प्रमुख राज तांडेकर , उपजिल्हा प्रमुख विनोद सांतगे ,युवासेना जिल्हा प्रमुख मंगेश गमे, नरखेडचे तालुका प्रमुख अजय बालपांडे कुहीचे तालुका प्रमुख सचिन पुडके, शिवसेना नागपुर शहर संपर्क प्रमुख अमित कातुरे व इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. शालिनीताई मेघे रुग्णालयाचे डॉक्टर,परिचारिका यांनी या शिबिरासाठी सहकार्य केले.
