नामदेवराव जाधवांना काळं फासलं, शरद पवार गटाचे आंदोलन

0

पुणे-मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणारे प्रसिद्ध वक्ते नामदेवराव जाधव यांना काळं फासण्याचा प्रकार शनिवारी पुण्यात घडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय असून यावेळी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या समर्थनात घोषणाबाजीही केली. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
अलिकडेच जाधव यांनी शरद पवारांच्या जातीच्या दाखल्यावरुन त्यांच्यावर टीका केली होती. (Namdevrao Jadhav in Pune) यावेळी पोलिसांनी जाधव यांचा बचाव करत घटनास्थळावरून त्यांना बाजूला नेले. पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचाही यावेळी समावेश होता. कार्यकर्त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन महाविद्यालय येथे होणाऱ्या नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. भांडारकर संस्थेने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द केला. त्याच दरम्यान नवी पेठेत कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्या चेहर्‍याला काळे फासले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा