शमी आमच्यासाठी धोकादायक-ऑस्ट्रेलियन कर्णधार

0

अहमदाबाद-एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील फायनल काही तासांवर आली असताना शनिवारी ऑस्ट्रेलियचा कर्णधार पॅट कमिन्सने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या संघासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे वक्तव्य केले आहे. कमिन्स म्हणाला, शमी खूप चांगला खेळत आहे. त्याची गोलंदाजी चांगली आहे. संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी चांगली झाली आहे. भारत हा खूप चांगला संघ आहे, पण आम्हीही चांगले खेळत आहोत, असे तो म्हणाला. (World Cup Cricket-2023)
पॅट कमिन्स म्हणाला की, अहमदाबादेतील क्रिकेट प्रेक्षकांचा भारताला एकतर्फी पाठिंबा असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघाला प्रचंड पाठिंबा मिळतो आणि हे विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले आहे. पण एका सामन्यात १.३ लाख प्रेक्षकांना शांत करणे समाधानकारक असेल. आमची सुरुवात चांगली झाली नाही, पण एक संघ म्हणून आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत. १९९९ मध्येही पहिले दोन सामने गमावून चॅम्पियन झालो होतो. पण ते आता जुने झाले आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यावर आमचे लक्ष आहे टीम इंडियाची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. पाच भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी 10 षटके टाकली. त्याच वेळी, संघाचे तिन्ही वेगवान गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि मधल्या षटकांमध्ये कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा अतिशय किफायतशीर गोलंदाजी करत आहेत आणि विकेटही घेत आहेत, याकडे कमिन्सने लक्ष वेधले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा