
अमरोहा : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविणारा मोहम्मद शमीचे सर्वच स्तरावर कौतूक होत आहे. आता त्यात उत्तर प्रदेशचे योगी सरकारही मागे नाही. उत्तर प्रदेश प्रशसनाने आता अमरोहा जिल्ह्यातील त्याचे मूळ गाव सहसपूर अलीनगरमध्ये क्रिकेट स्टेडियम बांधण्याची घोषणा केली आहे. (Cricketer Mohamad Shami)
अमरोहाच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी शमीच्या गावात सहसपूर अलीनगरमध्ये मिनी स्टेडियम आणि ओपन जिम बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्हा दंडाधिकारी राजेश त्यागी यांनी सांगितले की आम्ही मोहम्मद शमीच्या गावात मिनी स्टेडियम बांधण्याचा प्रस्ताव पाठवत आहोत. या प्रस्तावात खुली व्यायामशाळाही असेल. शमीच्या गावात यासाठी पुरेशी जमीन आहे. जिल्हा प्रशासनाच्या पथकाने शमीच्या सहसपूर अलीनगर गावाला भेट दिली होती. या पथकाने मिनी स्टेडियम आणि ओपन जीमसाठी जमिनीचा शोध घेतला. मोहम्मह शमीप्रमाणे खेळात प्रगती करण्यासाठी त्यांच्या भागातील तरुणांना मदत करणे हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.