भारतीय क्रिकेट संघाला रोहित शर्माच्या कुटुंबाकडून शुभेच्छा

0

नागपूर NAGPUR – भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याचे आईकडील आजोळ हे नागपूरचं आहे. रोहितच्या आईचे वडील हे मध्य रेल्वेत नागपुरात कार्यरत होते. रोहितचा जन्म हा नागपुरात एका खाजगी रुग्णालयात झाला. मुंबईला असताना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो आपल्या मामा-मामीकडे राहायला येत असे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना होणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर तब्बल एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरकर सज्ज झाले आहेत. रोहित शर्मा आणि त्याच्या कुटुंबियांकडून रोहित शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमला शुभेच्छा देण्यात आल्या. नागपुरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असून भारताच्या विश्वविजयासाठी सर्वांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. ज्योती अय्यर, रोहित शर्माची मामी,धनंजय अय्यर, रोहित शर्माचे मामा, शेजारी प्रिती शर्मा
अंजू अय्यर सारे विश्वविजेता भारतासाठी प्रार्थना करताना दिसले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा