
छत्रपती संभाजीनगर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आज अंतिम सामना आहे. देशभरात क्रिकेटचा फीवर चढला असून राज्यात विविध शहरांमध्ये सुद्धा जागोजागी तरुण क्रिकेट खेळताना,पाहताना दिसत असून क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड मोठा उत्साह दिसून येत आहे. क्रिकेटप्रेमी म्हणाले की, टॉस जिंकण्यावर सारे अवलंबून आहे. आपण प्रथम फलंदाजी घेतली तर 300 च्या वर रन करावे लागतील. गोलंदाजीमध्ये मोहम्मद शमी हा सध्या चांगलाच फॉममध्ये आहे. यामुळे भारताचा विजय हा निश्चित आहे. कर्णधार रोहित शर्माने चांगल्या पद्धतीचे नियोजन केलं आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमींना वाटतं की, भारतच विश्वचषक जिंकेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.