छत्रपती संभाजी नगर ते शिर्डी पायी दिंडीचे आयोजन

0

 

छत्रपती संभाजी नगर- साईबाबा सेवा मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही साई पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज ही पालखी छत्रपती संभाजी नगरमधील साई मैदान टीव्ही सेंटर येथून शिर्डी कडे रवाना झाली आहे. साईबाबा सेवा मंडळाच्या या पालखीचे हे सोळावे वर्ष आहे. त्यामुळे भाविकांची पायी पालखीमध्ये गर्दी असते यावेळी पालखीसोबत आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक म्हणून पोलीस प्रशासन यांचा या पालखीत सहभाग असतो. या पालखीमध्ये शेकडोच्या संख्येने भाविक 110 किलोमीटर पायी चालत जात असतात अशी माहिती
संदीप सकपाळ पाटील,साईबाबा सेवा मंडळ अध्यक्ष यांनी दिली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा