अजित पवार यांच्या निवास्थानासमोर तगडा बंदोबस्त, धनगर समाज आक्रमक

0

 

पुणे: बारामतीत धनगर आरक्षणाचा प्रश्न आता गंभीर होत चालला असून उपोषणकर्त्याची प्रकृती आता खालावली असून आजचा उपोषणाचा अकरावा दिवस असून देखील सरकारचा कोणताही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नसल्याने धनगर बांधव आता आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील 288 तर 48 खासदारांच्या दारात शांततेच्या मार्गाने बसण्याच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी महाराष्ट्रातील धनगर बांधवांना केल्या आहेत. जोपर्यंत आमदार आणि खासदार धनगर एसटी आरक्षणाबाबत पाठिंब्याचे पत्र आणि नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याचा वचननामा देत नाही तोपर्यंत त्यांच्या दारात आंदोलन सुरूच ठेवण्यांच्या सूचना उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांनी धनगर बांधवांना दिल्या आहेत.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा