युवा मोर्चाने संघर्ष करून संघटन वाढवावे- केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड 

0

नागपूर NAGPUR : भारतीय जनता युवा मोर्चाने पक्ष संघटना उभी करण्यासाठी प्रचंड संघर्ष करून संघटन वाढवणे आवश्यक असून त्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला निश्चित फळ मिळेल, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा वसा युवा मोर्चा ने घ्यावा असे आवाहन करत केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी भारतीय जनता युवा मोर्चा ने ठरवले तर इतिहास घडवण्याची ताकद युवा मोर्चामध्ये असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतराव कराड यांनी केले

छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठकीदरम्यान डॉ कराड बोलत होते यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस रोहित चहल राष्ट्रीय सचिव गौरव गौतम भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांत पाटील भाजपा प्रदेश महामंत्री संजय केणेकर भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री राहुल लोणीकर प्रदेश सचिव किरण पाटील छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांची प्रमुख उपस्थिती होती

२०२४ च्या महाविजयासाठी युवा मोर्चा ने सतर्क राहणे आवश्यक असून त्यासाठी युवा मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने प्रचंड मेहनत करण्याची आवश्यकता आहे आपले बूथ शक्ती केंद्र यासह मंडल सशक्तिकरण केल्यास २०२४ चा महाविजय भारतीय जनता पार्टीसाठी फारसा अवघड नसेल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री रोहित चहल यांनी केले

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील सरकार विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असून ४०० खासदार आणि २०० आमदार निवडून आणण्यात युवा मोर्चा सिंहाचा वाटा उचलेल असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला पूर्ण बहुमतातील सरकार निवडून आल्यास ३७० कलम हटवले जाऊ शकते तीन तलाक सारख्या जाचक प्रथा परंपरा थांबवल्या जाऊ शकतात कधी सुटणार नाही असा वाटणारा प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचा हिंदूंच्या आस्थेचा प्रश्न मार्गी लागू शकतो म्हणून सर्वांनी एकमताने भारतीय जनता पार्टी चा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही श्री लोणीकर यावेळी म्हणाले

महाविजय २०२४ साठी युवा मोर्चाने सज्ज राहणे आवश्यक असून युवा मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक बुधवारी रचना पूर्ण करून प्रत्येक मतदारापर्यंत जनसंपर्क केला जाऊ शकतो निवडणूकच्या काळात सर्वाधिक भार युवा मोर्चावर असतो अशा परिस्थितीत युवा मोर्चाने खंबीरपणे महाविजय २०२४ साठी कायम सज्ज राहणे आवश्यक असल्याचे मत भाजपा प्रदेश महामंत्री तथा युवा मोर्चाचे प्रभारी विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले

केंद्र व राज्य सरकारच्या उपलब्धी जनसामान्यांपर्यंत मांडणी आवश्यक असून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ सर्वसामान्य मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकार विषयी वाढती लोकप्रियता केवळ देशभरापूर्वी मर्यादित असून पंतप्रधानांच्या नावाचे व कार्याचे गारुड संपूर्ण विश्वभर पसरले आहे सहज क्षेत्रात देश बलशाली व आत्मनिर्भर बनत आहे सामाजिक राजकीय वैश्विक पातळीसह आर्थिक स्तरावर देखील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत चालले आहे जगातील काही महत्त्वाच्या अर्थव्यवस्था मध्ये भारतीय अर्थव्यवस्था आज गणली जाते. मोदी सरकारमधील ही बलशाली आर्थिक स्थिती लोकांसमोर मांडणे आवश्यक असून आभार भारतीय जनता युवा मोर्चा ने उचलावा असे आवाहन राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी गौरव गौतम यांनी केले

येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता युवा मोर्चा ची भूमिका निर्णायक राहणार असून युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा व विधानसभा कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर युवकांची फळी उभारून जनसामान्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी युवा मोर्चाचा महत्त्वाचा वाटा असणार आहे त्यासाठी युवा मोर्चाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरच्यांना अभियानासह आपल्याला दिलेल्या प्रवासाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजना पोहोचवणे आवश्यक आहे असे मत भाजपा मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी व्यक्त केले

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री शिवानी दाणे वखरे अनुप मोरे सोशल मेंगडे निखिल चव्हाण योगेश मैंद सुदर्शन पाटसकर बादल कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष राजगौरव वानखेडे मनोज भारस्कर छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष रामेश्वर भादवे यांच्यासह प्रदेशाचे सर्व प्रदेश पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व संघटनात्मक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सर्व संघटन महामंत्री यांच्यासह युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा