बावनकुळे जुगार खेळत होते, संजय राऊतांचा गंभीर आरोप

0

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मकाऊमध्ये कॅसीनो खेळत असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला असून त्यांनी यासंदर्भात फोटो ट्विट केला आहे. राऊतांच्या दाव्यावर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Chandrashekhar Bawankule)

खासदार राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये दावा केलाय की, बावनकुळे हे 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊ येथे जुगार खेळत होते. त्यांनी बरेच पैसे उडविल्याचा दावाही राऊतांनी केला. बावनकुळे म्हणतात की फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्या सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणतात कधीच जुगार खेळलो नाही. मग ते नक्की काय करत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल, झाला तेवढा तमाशा पुरेसा आहे, असा दावाही राऊतांनी केलाय. राऊतांच्या दाव्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने उत्तर देताना आदित्य ठाकरेंच्या एका पार्टीतील फोटो ट्वीट केला आहे आणि संजय राऊतांना आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हीस्की आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधीही जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी आहेत, तो तेथील परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही, असे भाजपने म्हटले आहे. दरम्यान, बावनकुळे यांनीही त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलेले आहे की, “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कॅसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे.”

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा