“मी माझी भूमिका घेऊन चालतोय..”-भुजबळ

0

नाशिक-मराठा व ओबीसी वादात आक्रमक भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले आहे. मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्यास ठाम विरोध करण्याच्या आपल्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा आहे की नाही, याचा मी विचार करीत नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. मी माझी भूमिका घेऊन निघालो आहे, हे देखील त्यांनी स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal on OBC Reservation)
छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू प्रकर्षाने उचलून धरल्यामुळे हा वाद अधिकच पेटला आहे. अलिकडेच भुजबळ यांच्या नेतृत्वात जालना जिल्ह्यात ओबीसी एल्गार जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा