
नवी दिल्ली-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या दाव्यांवर आजपासून निवडणूक आयोगापुढे दैनंदिन सुनावणी सुरु होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फूटीनंतर अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे पक्षावर दावा सांगण्यात आला होता. आता त्यावर लढाई सुरु झाली असून त्यावर आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय द्यावा लागणार आहे. (Hearing on NCP Factions before ECI)
अजित पवार गट आणि शरद पवार या दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगासमोर कागदपत्रे जमा करण्यात आली असून सोमवारपासून दोन्ही बाजुंचे वकील बाजू मांडणार आहे. संदर्भात पुढील काही दिवस सलग सुनावणी होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यताही आहे. मागील महिन्यात पार पडलेल्या सुनावणीत शरद पवारांनी हजेरी लावली होती. आज पवार दिल्लीत असून यावेळी ते उपस्थित राहणार की काय, याकडे लक्ष लागलेले आहे