भारतीय संघाबद्दल अभिमानच असायला हवा-सुनील गावस्कर

0

अहमदाबाद : वर्ल्ड कपचे स्वप्न भंगल्यावर आता पराभवावर विविध प्रतिक्रिया येत आहे. माजी कर्णधार सुनील गावस्कर Sunil Gavaskar  यांनी पराभवावर प्रतिक्रिया देताना भारतीय क्रिकेट संघाचे कौतूक केले आहे. फायनलमधील भारताच्या पराभवाचे दुःख नक्कीच झाले आहे. पण, त्याचवेळी या संघाने स्पर्धेत उत्तम खेळाचे प्रदर्शन केले आहे. त्यांना केवळ एक पाऊल पुढे टाकता आले नाही. मात्र, भारतीय संघाबद्दल आपल्याला अभिमान असायला हवा. icc world cup 2023  एका चांगल्या क्रिकेट संघाकडून पराभव झाल्याचे वाईट वाटायला नको. ऑस्ट्रेलिया यापूर्वी पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला आहे. भारतीय संघाने इतर सामन्यांमध्ये जबरदस्त कामगिरी केली, पण कालचा दिवस ऑस्ट्रेलियाचा होता, असे गावस्कर म्हणाले. (Sunil Gavaskar on World Cup Final)

राहुल द्रविड

टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड म्हणाला की आम्ही महत्वाच्या विकेट्स गमावल्याने लक्ष्यापेक्षा ३० ते ४० धावा कमी केल्या. ऑस्ट्रेलियाने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. आम्ही २८०-२९० पर्यंत मजल मारली असती तर हा परिणाम वेगळा राहिला असता, असे द्रविड म्हणाला.
द्रविडने रोहित शर्माचीही तारीफ केली. रोहित हा एक चांगला कर्णधार आहे, या स्पर्धेत त्यांने इतर खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आणि चांगली कामगिरी केल्याचे तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाने खरोखरच चांगली फलंदाजी केली. ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट फलंदाजी केली, याकडे त्याने लक्ष वेधले. आज पराभव जरी झाला असला तरीही उद्याचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी चांगला असेल. अशी अपेक्षाही द्रविडने व्यक्त केली.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा