ही विकृत मानसिकता थांबली पाहिजे – देवेंद्र फडणवीस

0

 

नागपूर -अकोला अत्याचार प्रकरण अतिशय गंभीर असून ही अत्याचार प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. भंडारा येथून शासन आपल्या दारी अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत सहभागी झाल्यानंतर नागपुरात ते बोलत होते.
खा संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत केलेल्या ट्विटबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, राऊत यांची मानसिकता यावरून दिसून येत आहे. बावनकुळे आपल्या संपूर्ण परिवारासोबत तिथे गेले आहेत.
ज्या हॉटेललात ते थांबले आहेत, तिथे रेस्टॉरंटच्या बाजूला केसिनो आहे. मात्र, राऊत यांनी अर्धा फोटो ट्विट केला आहे. पूर्ण फोटो ट्विट केला असता तर बावनकुळे यांची पत्नी, मुलगी, नातू सर्व त्या फोटोत दिसले असते. मुळात ही विकृत मानसिकता थांबली पाहिजे यावर देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा