शिंदे गटाचे १३ खासदार निवडणूक लढणार -खा कृपाल तुमाने

0

नागपूर NAGPUR  -रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी शिंदे गटाचे १३ खासदार पुन्हा निवडणुका लढविणार असून आम्हाला तयारी सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे रामटेकचे  KHASDAR TUMANE खा कृपाल तुमाने यांनी स्पष्ट केले आहे.एका वाहिनीशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. तुमाने यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना तयारीच्या सूचना दिल्याचे तुमाने यांनी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनानंतर महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा होणार आहे. त्या बैठकीतच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविला जाणार आहे. मात्र, सध्यातरी आम्हाला तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने रामटेक लोकसभा मतदारसंघात काम सुरु आहे.

मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय शिबीरे रामटेक परिसरात घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभेत महायुतीचे ४५ खासदार निवडून येतील व ते पंतप्रधान मोदी यांना भक्कमपणे साथ देतील, असे खासदार तुमाने यांनी सांगितले. याचवेळी संजय राऊत यांच्या वक्तव्याची कुणीच दखल घेत नाही, वेडा राजकारणी संबोधतात असेही खा तुमाने म्हणाले.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा