वाघाच्या हल्यात मृत्यू,आ अनिल देशमुख यांच्या हस्ते 10 लाखाचा धनादेश

0

नागपूर – अलीकडेच कोंढाली परिसरात वाघाच्या हल्यात मृत गोपालक अमोल(विशाल) अंबादास मुंगभाते ‌यांचे आई व वडील यांना वन विभागाकडून 25 लाखाचा मोबदला मंजूर करण्यात आला असून 10‌लाखाचा धनादेश माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. 15लाख रूपये फिक्स डिपॉजिट करण्यात येणार आहे.
कातलाबोडी येथील रहिवासी अंबादास यांचा लहान मुलगा अमोलअंबादास मुंगभाते सकाळी आठ वाजता जेवनाचा डबा घेऊन
आपल्या १० गायी व १८म्हशी यांना घेऊन चराईसाठी परिसरातील जंगलात गेला‌. अमोल (विशाल)‌ची गूरे भडभड्या नाल्यालगत चरत होती. या दरम्यान अमोल ही लगतच्या भडभड्या नाल्याकाठी दुपारचे जेवण करण्यास बसत असतानांच अमोल वाघरूपी काळाने झडप घातली. वाघाच्या हल्यात अमोलचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी,सहकारी, गावकऱ्यांच्या मदतीने घणदाट जंगलातून अमोल मुंगभातेचा मृतदेह शोधून काढला. या प्रकरणी या भागातील आमदार व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कातलाबोडी गाठून अमोल अंबादास मुंगभाते यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना देण्यात येणारा २५ लाखाचा मोबदला मंजूर करण्यासाठी आमदार अनिल देशमुख यांनी उपवनसंरक्षक डॉ भारतसिंह हाडा यांच्यासोबत चर्चा केली. ‌या प्रसंगी कोंढाळी वनपरिक्षेत्राधिकारी निशिकांत कापगते,‌ व अन्य वन अधिकारी व कर्मचारी ,नागपूर जिल्हापरिषद चे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले, प्रभाकर साठे,नवनिर्वाचित सरपंच अर्चना खोब्रागडे , वन्य जीव संरक्षण मानद सदस्य उदयसिंह यादव, प्रभाकर साठे, धनराज भड, राहूल भड व गावकरी उपस्थित होते.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा