अनिल देशमुखांची मुलगी, सुनेवर आरोपपत्र

0

मुंबई-राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुनेवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. माध्यमांमध्ये अहवाल लिक केल्याच्या २०२१ मधील प्रकरणात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात पूजा यांच्यावर कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Former Home Minister Anil Deshmukh)
सीबीआयच्या माहितीनुसार, पूजा यांनी हा अहवाल मिळवण्यासाठी अनिल देशमुख यांचे वकील आनंद दिलीप डागांसोबत कट रचला होता. त्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना अहवाल देण्यासाठी लाच देण्याची योजना केली होती. २९ ऑगस्ट २०२१ रोजी हा अहवाल माध्यमांमधून लीक झाला होता.

मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले होते. त्यासंदर्भातील अहवाल तयार केला गेला. हा अहवाल पूजा हिने लिक केल्याचा आरोप आहे. त्या अहवालात अनिल देशमुख यांनी कोणताही गुन्हा केला नाही, असे म्हटले असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेत तिवारी आणि अनिल देशमुख यांचे वकील डगा यांना अटकही झाली होती. दोन वर्षानंतर सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. अनिल देशमुख यांची मुलगी पूजा आणि सून राहत देशमुख यांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा