
नागपूर NAGPUR -धानाला-बोनस द्यावा ही मागणी अनेकांची आहे, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान हे व्यापाऱ्याला विकलेले आहे. संपूर्ण धान व्यापाऱ्यांनी उचलल्यावर सरकार बोनस देण्याची घोषणा करणार आहे का? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Vadettiwar यांनी केला आहे.
सरकारला आता लगेच ही घोषणा करता आली असती. मात्र केवळ वेळकाढूपणा सरकार करत आहे. सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे, पैसे नाही. अनेक काम करणाऱ्या एजन्सीचे पैसेच मिळाले नाहीत. 10 ते 12 हजार कोटी कंत्राटदार पैसे दिले नाही. बिल थकले आहे, कंत्राटदारापर्यंत जर पैसे पोहचले असते तर ते मजुरापर्यंत गेले असते. मात्र, सगळ्यांची दिवाळी अंधारात घालवण्याचे काम सरकारने केले आहे. आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात धान आहे, त्यापूर्वी धान उत्पादकांना लवकर बोनस देण्याची मागणी केली. संजय राऊत,चंद्रशेखर बावनकुळे संदर्भातील ट्विटवार बद्दल मला त्यात पडायचे नाही. मराठा आंदोलनात लाठीचार्ज कोणी केला हे जरांगे पाटील बघतील किंवा सरकार बघेल, मात्र, तो लाठीचार्ज दुर्दैवी होता. अशी घटना सरकार टाळू शकले असते. हे सरकारचे अपयश आहे. अनेक महिलांवर लाठीचार्ज झाला. पोलिसही मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. या लाठीचार्जची चौकशी झाली पाहिजे, निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी हिवाळी अधिवेशनात आम्ही करू असेही वडेट्टीवार म्हणाले.
