प्रेयसीची हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह

0

मुंबई MUMBAI : मुंबईच्या कुर्ला परिसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. आता त्या सुटकेसचे रहस्य उलगडण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून लिव्ह इन (Live In Relation) च्या प्रकरणातून ते हत्याकांड घडल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कुर्ला मेट्रोच्या बांधकाम साईटवर सापडलेल्या त्या सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह होता आणि ती धारावी परिसरातील रहिवासी होती, अशीही माहिती पोलिसांना मिळाली आहे.
कुर्ला मेट्रोच्या बांधकामस्थळावर रविवारी पोलीसांना एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता. महिलेची ओळख पटविण्यात यश आल्यावर पोलिसांनी तिची माहिती काढली असता ती एका युवकासोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये होती. चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा