चंद्रपूर : २३५ जणांचे नामांकन अर्ज दाखल

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतींमध्ये १५ जानेवारी २०२१ रोजी  होणाºया सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत २३५ जणांनी  ऑपलाईन उमेदवारी अर्ज दाखल कले. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवट दिवस आहे. त्यामुळे उमेदवारांची गर्दी होऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने यंत्रणा सज्ज केली आहे.   ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरूवात झाली. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ४ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप  केले जाणार आहे. यंदा सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. सोमवारी चंद्रपूर, मूल तालुक्यात प्रत्येकी १, चिमूर ४ आणि वरोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी २२ नामांकन अर्ज दाखल झाले होते. सोमवारी चिमूर तालुक्यात ३५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची आपले सेवा केंद्रावर संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नामनिर्देशन पत्र भरण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाचे वेबसाईटवर उपलब्ध आहे.  संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. संगणकीकृत पध्दतीने नामनिर्देशन पत्राची प्रत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.  असा आहे निवडणूक कार्यक्रम   २३ डिसेंबर २०२० पासून ३० डिसेंबर २०२० पर्यंत नामांकन सादर करता येणार आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी नामांकनाची छाणनी होईल. ४ जानेवारी २०२१ रोजी नामांकन परत घेता येईल. त्याचबरोबर उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात  येणार आहे. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी आणि मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे, अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिली.    तालुकानिहाय दाखल झालेले ऑफलाईन उमेदवारी अर्ज  राजुरा ३६, कोरपना ८, गोंडपिपरी २६, चंद्रपूर २८, मूल २६, पोंभुणार् २, बल्लारपूर ३१, ब्रह्पुरी ४१, सिंदेवाही ५, सावली १३, चिमूर ३९, नागभीड ३०, वरोरा ७२ व भद्रावती तालुक्यात ऑफलाईन २, असे एकूण २३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारपर्यंत दाखल केलेल्या ऑनलाईन अर्जांची माहिती संकलित करण्याचे काम मंगळवारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक प्रशासनाकडून सुरू होते.

माजरीत लिंक फेलमुळे तारांबळ माजरी : ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ऑनलाईन नामांकन अर्ज भरताना मंगळवारी दुपारपासून सर्व ऑनलाईन अर्ज भरताना ठिकाणी लिंक फेल झाले. त्यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये तारांबळ उडाल्याचे दिसून आले. ऑफलाईन नामांकन घेण्याबाबत जिल्हाधिका-यांकडून आदेश नाही, अशी माहिती तहसीलदार महेश शिंतोडे यांनी  दुपारी दिली. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी विविध ठिकाणी महासेतु व इतर ठिकाणावरून अर्ज भरून क्षेत्राच्या अधिकारीनुसार अर्ज जमा करायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.