गोंदियाच्या आरोग्यसेवेत दाखल होणार २५ रुग्णवाहिका

 गोंदिया
रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता यावे, त्यांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने आरोग्य विभागाने आरोग्यसेवा सबळ करण्यासाठी पाऊल उचलले आहे. आरोग्यसेवा आयुक्तालयाने राज्यासाठी ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत पैकी २५ रुग्णवाहिका गोंदिया जिल्ह्याचा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे या रुग्णवाहिका १0२ या गरोदर माता, प्रसूत माता, नवजात शिशुंच्या आरोग्य सेवेसाठी कार्यरत होणार आहेत.
गोंदिया जिल्हा दुर्गम, आदिवासी, जंगल व्याप्त म्हणून ओळखला जातो. आजही जिल्ह्यातील अनेक गावांत आरोग्याच्या भौतिक सोयी-सुविधा पोहोचल्या नाहीत. कोरोना संसर्ग काळात भौतिक सोयी, सुविधांअभावी रुग्णांची चांगलीच गैरसोय झाल्याचे पहावयास मिळाले. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेकदा रुग्णांचा जीवही जातो. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ, सबळ व्हावी या दृष्टिकोनातून राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ४६२ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. गोंदिया जिल्ह्याला सर्वाधिक २५, भंडारा ८, गडचिरोली १२, चंद्रपूर २0, अकोला २, अमरावती ४, बुलढाणा २१, वर्धा व वाशिम जिल्ह्यासाठी प्रत्येकी ३ अशा विदर्भातील दहा जिल्ह्यांत ८८ रुग्णवाहिका दाखल होणार आहेत.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.