देशात २६,३८२ नवे कोरोनाबाधित, ३८७ मृत्यू

नागपुरात ४३६ पॉझिटिव्ह, तीन बळी
बुधवार १६ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात केवळ दोन कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. ही गेल्या काही दिवसांमधील सर्वात कमी नोंद असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्य़ाबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकू ण कोरोनाबळींची संख्या आता ३८१६ वर पोहचली आहे. यातील ५५५ मृतक हे नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. तर आज दिवसभरात लक्षणे नसलेले व नियमानुसार विलगीकरणाचा कालावधी झालेल्या २३१ जणांना सुटी देण्यात आली. अर्थात ते कोरोनामुक्त झाले. यासोबतच एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ८ हजार ५५५ वर गेली आहे. बुधवारी ४३६ नवे कोरोनाबाधित आढलून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७३ टक्क्यांवर पोहचले आहेत. सध्यस्थितीत जिल्ह्यात ५९७६ सक्रिय रुग्ण आहेत. यातील लक्षणे नसलेले ४५३९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य व मध्यम लक्षणे असलेले १४३७ जण शासकीय खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहेत.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ४३६ भंडारा – ६७ चंद्रपूर – १00
गडचिरोली – ५२
यवतमाळ – ३३
गोंदिया – ३८
अमरावती – ६५
देशातील कोरोना संसर्ग अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २६ हजार ३८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, ३८७ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र असे जरी असले तरी कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही दररोज भर पडताना दिसत आहे. कारण, याच कालावधीत देशात ३३ हजार ८१३ जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ९९ लाख ३२ हजार ५४८ वर पोहचली आहे. सद्यस्थितीस देशात ३ लाख ३२ हजार २ एवढे अँक्टिव्ह केसेस असून, ९४ लाख ५६ हजार ४४९ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर आतापयर्ंत १ लाख ४४ हजार ९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.