१३0 ग्रामपंचायतींसाठी ३,१४३ नामनिर्देशन पत्र दाखल 3,143 nomination papers filed for 130 gram panchayats

नागपूर
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या असून, त्यानुसार निवडणुकीची नोटीस १३ तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली असून, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात १३0 ग्रामपंचायतींसाठी ३,१४३ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे.
नागपूर जिल्हय़ातील १३0 ग्रामपंचायतीसाठी २६९ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर रोजी तालुकास्तरावर करण्यात आली आहे. जिल्हय़ातील १३ तालुक्यातील १३0 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३,१४३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काटोल ५५, नरखेड ३६१, सावनेर ३२३, कळमेश्‍वर ११७, रामटेक २३७, पारशिवनी २२६, मौदा १६३, कामठी २३९, उमरेड २७९, भिवापूर ७५, कुही ४९२, नागपूर ग्रामीण ४२९ व हिंगणा १४७ यांचा समावेश आहे. उमेदवारांना उमेदवारी अर्ज ४ जानेवारी २0२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येईल. दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरित्या निवडणूक लढणार्‍या उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून चिन्ह वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावर करण्यात येईल. निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास ५0५ मतदान केंद्रांवर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजतापर्यंत मतदान घेतल्या जाईल. मतदानानंतर मतमोजणी १८ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता तालुकास्तरावर करण्यात येणार असून मतदानाचा निकाल जाहिर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २१ जानेवारी २0२१ रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.