३५३ रुग्ण, ७ मृत्यू

नागपूर : मागील ६ दिवसापासून ५ हजाराखाली संशयित कोरोनाबाधितांच्या चाचण्या होत आहे. यामुळे रुग्णांची संख्याही ३५० ते ४०० ..

नागपूर : मागील ६ दिवसापासून ५ हजाराखाली संशयित कोरोनाबाधितांच्या चाचण्या होत आहे. यामुळे रुग्णांची संख्याही ३५० ते ४०० दरम्यान दिसून येत आहे. गुरुवारी ४०९३ चाचण्या, ३५३ नव्या बाधितांची नोंद तर ७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या १२१३४६ झाली असून मृतांची संख्या ३८७८ वर पोहचली. विशेष म्हणजे, कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनची संक्रमणाची भीती नागरिकांमध्ये आता दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात आज ३३७० आरटीपीसीआर तर ७२३ रॅपिड अँटिजेन चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून २९ तर आरटीपीसीआर चाचणीतून ३२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्सच्या प्रयोगशाळेतून १५, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ५२, मेयोच्या प्रयोगशाळेतून १०९, माफसूच्या प्रयोगशाळेतून १४, नीरीच्या प्रयोगशाळेतून १३, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून ३३ तर खासगी लॅबमधून ८८ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील २२३, ग्रामीणमधील १२६ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील १, ग्रामीणमधील २, जिल्हाबाहेरील ४ आहेत. ३५३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ११३३०७ झाली आहे. हे प्रमाण ९३.८ टक्क्यांवर गेले आहे. -२४ दिवसापासून ५०० च्या खाली रुग्णसंख्या या महिन्यातील १ डिसेंबर रोजी ५१५, ३ डिसेंबर रोजी ५३६ तर ५ डिसेंबर रोजी ५२७ असे तीनच दिवस ५०० वर दैनंदिन रुग्णसंख्या गेली. मागील २४ दिवसांपासून मात्र ३५० ते ४०० दरम्यान रुग्णसंख्या दिसून येत आहे. तर मागील ११ दिवसात ७ दिवसच चाचण्यांची संख्या ५ हजारांवर गेली आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचा दर ८.६२ टक्के आहे. सध्या ४१६१ रुग्ण उपचाराखाली आहेत. -दैनिक संशयित : ४०९३ -बाधित रुग्ण : १२१३४६ _-बरे झालेले : ११३३०७ – उपचार घेत असलेले रुग्ण : ४१६१ – मृत्यू : ३८७८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.