इमारतीच्या भीषण आगीत ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

नागपुरातील छावणी परिसरात असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली.या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. लता कारपटवार असे मृत महिलेचे नाव आहे. ४५ वर्षीय मृत महिला हि केमिकलचा दुकानात साफसफाईचे काम करायची. आग विझवल्यावर इमारतीचा मलबा हटवना या महिलेचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांना सापडला.  नागपूरच्या सदर परिसरातील छावणी वस्तीत आज सकाळी सव्वा ११ च्या सुमारास आग लागल्याची सूचना महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली  त्यानंतर अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आग ज्या ठिकाणी लागली होती ते घर दोन माजली असून तळमजल्यावर दुकान,पहिल्या मजल्यावर एक कुटुंब राहते तर दुसऱ्या मजल्यावर फटाके ठेवण्यात आले होते.  कार वॉश करिता लागणारे रसायन व कार परम्युम चे दुकान तळमजल्यावर आहे. याच ठिकाणाहून आगीची सुरवात झाली जी नंतर दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली. दुसऱ्या मजल्यावर फटाके असल्याने आगीने अधिकच भीषण रूप धारण केले.  अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तळमजल्यावरील दुकानातील विद्युत पॅनल मधून आग सुरु झाली,त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले पण इमारतीच्या तीनही मजल्यावर ज्वलनशील पदार्थ असल्याने आग संपूर्ण इमारतीत पसरल्याचे माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.