ग्राम पंचायत निवडणुकीत ‘दहेली तांडा’ पॅटर्न राबवण्याचे किशोर तिवारी यांचे आवाहन |

Kishor Tiwari’s appeal to implement ‘Daheli Tanda’ pattern in Gram Panchayat elections

गेल्या २० वर्षापासुन बिनविरोध ग्राम पंचायत निवडणुकीची परंपरा जपणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील  “दहेली तांडा ” या आदीवासी व भटक्या जमातीच्या खेड्याचा आदर्श ठेऊन नामांकन भरलेल्या इच्छुक उमेदवारांमध्ये पंचायती समोर, चावडीवर, समेटाने वा ईश्वर चिठी काढून निवडणुक बिनविरोध करावी असे आवाहन वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले आहे.

ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती निवडणुक आली तर बगळ्यासारखे पांढरे कपडे घालून शहरातुन नेते येतात व गावागावात गट पाडून निवडणुक घडून आणतात.  एकदाची निवडणूक झाली म्हणजे हे गट पाच वर्ष याच नेत्यांच्या इशाऱ्यावर भांडण, तक्रारी करतात. मात्र हे राजकीय नेते कधीच कोणत्याही शेतकऱ्याच्या आदीवासी गावाच्या घरकुल, निराधार, पाणी, रस्ता, शाळा, शाळेवरील शिक्षक, न येणारा ग्रामसेवक, पटवारी, कृषी सहाय्यक वा सरकारी योजना यावर काम करण्यासाठी येत नाही. मात्र  यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील  ‘दहेली तांडा’ या आदीवासी व भटक्या जमातीच्या खेड्यात मागिल २० वर्षापासून निवडणूक नाही, गटबाजी नाही असा संकल्प केला. यावर्षीसुद्धा एका वार्डात एका पदाकरीता एकच अर्ज टाकुन कोणताही वाद न करता निवडणूक बिनविरोध केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनी गावात सामंजस्य,प्रेम,विकास,मैत्री व संवाद जिवंत ठेवण्यासाठी व पोटभरू घाणेरडे गटबाजीचे राजकारण करणाऱ्या या लोकनेत्याना गावबंदी करून निवडणुका बिनविरोध कराव्या अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे. ज्या ग्रामपंचायती गटबाजी सोडुन  ‘दहेली तांडा’ पॅटर्न लागू करतील त्यांना पालकमंत्र्यांनी विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. मात्र जर “दहेली तांडा ” पॅटर्न लागू करणाऱ्या सर्व ग्रामपंचायती  कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या “आधार उद्धवच्या ” या प्रकल्पामध्ये समावेश करून प्रत्येक विकासाच्या, शिक्षणाच्या, शेतीकर्जाच्या, युवक व महिलांच्या रोजगाराच्या योजना राबविण्याचे आश्वासन किशोर तिवारी यांनी दिले आहे.

Kishor Tiwari's appeal to implement 'Daheli Tanda' pattern in Gram Panchayat elections

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.