उत्तरप्रदेशातील विचित्र अपघातात 5 जणांचा मृत्यू

श्रावस्ती, 04 सप्टेंबर : उत्तरप्रदेशातील श्रावस्ती येथे तीन वाहनांच्या विचित्र अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलेय.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार श्रावस्ती येथील नागारायणपूर गावात शुक्रवारी रात्री उशिरा रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला रिक्षाने धडक दिली. जोरदार धडकेमुळे रिक्षातील प्रवाशी रस्त्यावर फेकले गेले, अन् त्याचवेळी महामार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकखाली चिरडले गेले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात मृत्यु पावलेले बलरामपूरच्या हासिमपारा येथील रहिवाशी आहेत. निजाम (35), किताबुल निशा (71), लिलाही (50), परवीन (25), रुबीना (25) यांचा मृत्यु झाला. तर सायरा बानो, आशमा, बसयुद्दीन हे गंभीर जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.