अखेर थिएटर्स उघडणार, 50 टक्के क्षमतेची मर्यादा, सरावासाठी स्वीमिंगपूलही खुले

-6-guidelines-theaters-will-start-from-5th-november

राज्यात उद्या 5 नोव्हेंबरपासून थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्या   ५ नोवेंबर पासून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच योगा, स्विमिंगपूलसह बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शुटिंग रेंज आदी इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. या निर्णयाने थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे (Unlock 6 Guidelines Theaters Will Start From 5th November).

त्याशिवाय राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठीच स्विमिंग पूल सुरु करण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागणार आहे. तसेच, कंटेन्मेंट झोनमध्ये या सर्व गोष्टींना बंदी कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने आज एक आदेश जारी केला आहे (Unlock 6 Guidelines). त्यानुसार, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी 50 टक्के प्रेक्षक क्षमतेची अट घालण्यात आली आहे. शिवाय कंटेन्मेंट झोनमधील थिएटर आणि सिनेमागृहांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स उघडताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

स्विमिंग पूल सुरु, पण…

राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूंनाच तूर्तास तरी त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.