अकोला – सलग सहाव्यांदा उघडले या धरणाचे दरवाजे; जिल्ह्यातील प्रकल्प भरले

अकोला, 7 सप्टेंबर – अकोलेकरांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्प सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झालाय. प्रकल्पात 96 टक्क्यांच्या वर पाणी साठा गेल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात आणि धरण परीसरात जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. तर अकोलेकरांचे लक्ष लागून असलेल्या महान येथील काटेपूर्णा धरणाची पातळी ही 96.42 टक्क्यांवर वर गेली आहे.

पाणी साठ्यात वाढ झाल्याने काटेपूर्णा प्रकल्पाचे 2 वक्रद्वारे प्रत्येकी 30 सेंटीमीटर उंचीने उघडली असून नदीपात्रात एकूण 50.16 घ.मी./से एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर 13 जून रोजी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यानंतर 21 धरण साठ्यात सातत्याने मोठी वाढ झाली. त्यामुळे सलग सहा वेळा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. काटेपूर्णा धरण हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी समजले जाते तर अकोला शहराला पाणी पुरवठा देखील याच धरणातुन केला जातो. जिल्ह्यात तसेच धरण परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्याने धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशी माहिती अभियंता निलेश घारे यांनी दिली आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.