JEE मेन्स परीक्षेसाठी आता 75 टक्के गुणांची आवश्यकता नाही, लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. JEE मेन्स परीक्षेच्या निकालावरच विद्यार्थ्यांना NIT, IIT, SPA आणि CFIT सारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो.(No requirement of 75% marks in 12th exam for JEE Mains exam this year)

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मागील महिन्यात याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारने कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता JEE मेन्स परीक्षेसाठी किमान 75 टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. 12वी परीक्षेत कमीतकमी 75 टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे.

Ministry of Education has decided to waive off 75% marks (in class 12 exam) eligibility criteria under JEE (Main) for the academic year 2021-2022 in respect of NITs, IIITs, SPAs and other CFTIs, whose admissions are based on JEE (Main).

— ANI (@ANI) January 19, 2021

JEE परीक्षा वर्षातून 4 वेळा

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मागील महिन्यात केलेल्या घोषणेनुसार 2021 पासून JEE मेन्स परीक्षा वर्षातून 4 वेळा घेतली जाणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात आयोजित केली जाणार आहे. JEE मेन्स परीक्षेच पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या दरम्यान होणार आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेता या वर्षी IIT सह टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 12 वी परीक्षेत 75 टक्के गुण घेण्याची अट यंदा रद्द करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.