शहरात ९४ टक्के लसीकरण 94% vaccination in the city

नागपूर
सुरुवातीला मंद वेगाने सुरू झालेल्या लसीकरणाला आता आरोग्य कर्मचार्‍यांकडून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.शनिवारी शहरीभागात तब्बल ९४.४ टक्के तर ग्रामीण भागात ८३.४३ टक्के इतके लसीकरण झाले.
नागपूर शहर व ग्रामीण भागातील १२ केंद्रांवर लसीकरण होत आहे. यामध्ये प्रत्येक केंद्रावर शंभर असे बाराही केंद्रांवर दैनंदिन १२00 कर्मचार्‍यांना लसीकरणाचे लक्षांक ठेवण्यात आले आहे. शनिवारला ग्रामीण भागामध्ये ग्रामीण रुग्णालय हिंगणा केंद्रावर ८४, उपजिल्हा रुग्णालय कामठी ७४, ग्रामीण रुग्णालय काटोल ९८, उपजिल्हा रुग्णालय रामटेक १0५, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण संस्था सावनेर येथे ८0, ग्रामीण रुग्णालय उमरेड येथे ४५ तर लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा येथे ९८ अशा ग्रामीण भागातील सात केंद्रांवर ७00 पैकी ५८४ आरोग्य कर्मचार्‍यांचे म्हणजेच ८३.४३ टक्के लोकांचे लसीकरण झाले. तर शहरातील पाच केंद्रांपैकी एम्समध्ये १३३ लोकांचे लसीकरण झाले. मेयोमध्ये ८७, मेडिकल ४४, डागा ७५ तर महापालिकेच्या पाचपावली प्राथमिक आरोग्य केंद्रात १३३ लोकांचे लसीकरण झाले. शहरीभागातील पाचही केंद्रावर ५00 पैकी ४७२ म्हणजेच ९४.४ टक्के इतके लसीकरण झाले. लसीकरणानंतर कुणाला कुठलेही रिएक्शन, इतर समस्या उद्भवली नसल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.