अत्याचार करणाऱ्या वडिलांची १६ वर्षीय मुलीने हत्या. A 16-year-old girl murdered an abusive father

मुलीने वडिलांच्या डोक्यावर धोपटण्याने वार करुन हत्या केली

दारु पिऊन सतत आईला मारहाण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वडिलांची १६ वर्षीय मुलीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे. कपडे धुण्यासाठी वापरणाऱ्या धोपटण्याने मुलीने वडिलांच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात तिच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मुलीने १०० नंबरवर पोलिसांना फोन करुन आत्मसमर्पण केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती बेरोजगार होती. आपल्या मोठ्या मुलाच्या कमाईवरच त्याचा खर्च भागत होता. सतत दारु पित असल्याने आणि हिंसाचार करत असल्याने कुटुंब कंटाळल होतं. बुधवारी संध्याकाली ६.३० वाजण्याच्या सुमारास घरात मुलाच्या लग्नाची चर्चा असताना पीडित व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

यामुळे चिडलेल्या मुलीने धोपटणं उचललं आणि वडिलांच्या डोक्यावर वार करण्यास सुरुवात केली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने १०० नंबरवर पोलिसांना फोन केला आणि आपण हत्या केली असून अटक होण्यासाठी वाट पाहत आहोत असं सांगितलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.