र्ध्यात गोल बाजार परिसरात भीषण आग, 10 ते 15 दुकाने जळून खाक | A huge fire broke out in Gol Bazaar area, burning 10 to 15 shops

वर्धा : शहराच्या गोल बाजार परिसरात भीषण आग  लागलीय. आगीत जवळपास 10 ते 15 भाजी विक्रेत्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. सध्या घटनास्थळी वर्धा अग्निशामक दलाकडून आग विजविण्याचा प्रयत्न सुरु आहे. (Wardha Gol Bazar Market Fire)

शहराच्या मुख्य बाजारपेठेत आग लागल्याने खळबळ उडाली आहे. आगीत भाजीपाला, फ्रुट, विक्रीचे साहित्य आणि दुकाने जळून खाक झाली आहेत. काही वेळेतच आगीने रौद्ररूप धारण केलं. यावेळी परिसरात नागरिकांची एकच गर्दी झाली होती.

आगीत भाजी व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आगीत हातगाड्यांच्या बंडी देखील जळून खाक झाल्या आहेत. गोल बाजार परिसरात घटनास्थळी पोलिसांसह, अग्निशामक दल दाखल झालं आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.