अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

Share This News

मुंबई : श्वसनास त्रास होत असल्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिलीप कुमार (वय ९८) यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिली. दिलीप कुमार यांना वाढत्या वयामुळे काही व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यातही त्यांना नियमित तपासणी आणि चाचण्यांसाठी दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.