कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा व पुरवठा |Adequate stock and supply of medicines required for covid prevention

मुंबई, दि. 25 : कोविड 19आजाराच्या प्रतिबंधासाठी लागणारी औषधे, फेस मास्क व हॅन्ड सॅनिटायझर  पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत तसेच एन-95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस मास्क रास्त किमतीत जनतेस उपलब्ध आहेत. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दिली आहे.

राज्यात कोविड- 19 च्या संसर्गाचे वाढत असलेले प्रमाण व त्याबरोबर वाढती रुग्णसंख्या बघता राज्यात कोविड -19 ची दुसरी संभाव्य लाट येण्याची  शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर  अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे, बृह्नमुंबई, आणि कोकण विभागातील औषध सहआयुक्तांसोबत बैठक घेतली.

कोविड-19 या आजाराच्या उपचारासाठी लागणारी औषधे प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, मेडिकल ऑक्सिजन, मास्क व हॅन्ड सॅनिटायझरच्या  विभागनिहाय उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला.

राज्यात कोविड रुग्णालय व औषध वितरक यांच्या स्तरावर  रेमडेसिवीर इन्जेक्शन 51,425, फॅविपिरावीर टॅबलेट 200/400 mg-20,15,381 औषधांचा साठा उपलब्ध आहे. या शिवाय मायलन लॅब या उत्पादकाच्या नागपूर डेपो मध्ये 1.97 लक्ष  रेमडेसिवीर इन्जेक्शन (Remdesivir Inj ) चा साठा वितरणासाठी उपलब्ध आहे. राज्यात कोविड १९  उपचारासाठी लागणाऱ्या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा साठा व नियमित पुरवठा कोविड रुग्णालये व इतर रूग्णालयास सुरु आहे. अद्याप वाढीव मागणी राज्याच्या कोणत्याही भागातून करण्यात आलेली नाही. राज्यातील 30 उत्पादक व 88 रीफिलर /वितरक यांची एकत्रित मिळून 1287  मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजन उत्पादन क्षमता आहे. राज्याची प्रतिदिन 513 मेट्रिक टन इतकी मागणी आहे. उत्पादक स्तरावर डेड साठा वगळता 6227 मेट्रिक टन व रुग्णालये स्तरावर 2489 मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे.

आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी सर्व विभागाच्या सह आयुक्त (औषधे) , सहायक आयुक्त (औषधे ) यांना  स्थानिक जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणा यांचेशी समन्वय ठेवून  कोविड 19 आजाराच्या उपचारासाठी लागणारे  मेडिकल ऑक्सिजन, औषधे तसेच प्रतिबंधात्मक  फेस  मास्क व हॅन्ड सॅनिटायझरची उपलब्धता सहज व रास्त दराने  होईल यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे नियमितपणे राज्यातील कोविड 19 च्या आजारासाठी लागणाऱ्या औषधाच्या उपलब्धतेचा आढावा घेत असून आवश्यक दिशानिर्देश प्रशासनास देत आहेत.

कोविड – 19 च्या उपचारांसाठी  लागणारी औषधे, मेडिकल ऑक्सिजन, एन 95, 2 प्लाय व 3 प्लाय फेस  मास्क व हॅन्ड सॅनिटायझर इ. चा तुटवडा, काळाबाजार  बाबत काही तक्रार असल्यास  प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.