आदित्य एंटरप्रायजेस या कंपनीतर्फे मिहान कंटेनर डेपोत ३७ कोटी 90 हजाराचा मुरूम चोरी

Aditya Enterprises stole Rs 379 million from Mihan Container Depot

नागपूर
उत्खनन करण्यास मनाई करण्याचे आदेश दिल्यावरही आदित्य एंटरप्रायजेस या कंपनीतर्फे मिहान कंटेनर डेपो येथे १ कोटी ३७ लाख ९0 हजार रुपयांचे मुरूम बेकादेशीरपणे चोरून नेले. याप्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोनेगाव हद्दीत भारतीय कंटेनर निगम मिहान कंटेनर डेपो, येथे कंटेनर निगमचे मेसर्स दास यांना ४ फेब्रुवारी २0२0 ते ४ मार्च २0२0 या काळात मिहान कंटेनर डेपो मधील तेवर क्लॉक डिपार्टमेंन्टचे काम करण्यासाठी करण्यासाठी त्यांच्या मशिनरी फोकलॅन जेसीबी डांबर इत्यादी वाहने कंटेनरच्या आत येण्याजाण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंटच्या कामास सुरुवात झाली. ४ फेब्रुवारीला मेसर्स दास कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांना कळविण्यात आले की, त्यांनी केलेल्या करारनाम्याप्रमाणे तेवर ब्लॉक डेव्हलपमेंटच्या कामाचे आवश्यक मुरूमाचे काम पूर्ण झाले नाही. तरीही कॉन्ट्रॅक्टरने दुसर्‍या ठिकाणी उत्खनन करून १ कोटी ३७ लाख ९0 हजाराचा मुरूम मेसर्स आदित्य इंन्टरप्रायजेसचे मालक नीलेश यांनी बेकादेशीरपणे विश्‍वासघात करून चोरून नेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.