मध्य प्रदेशात एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आंबेडकर-हेडगेवारांचे धडे

भोपाळ : मध्यप्रदेशात ‘एमबीबीएस’ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार, भारतीय जनसंघाचे नेते दीनदयाल उपाध्याय आणि तेजस्वी विचारांचे महामेरू स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांचे जीवनकार्य शिकविले जाणार आहे. फाऊंडेशन अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नैतिक मूल्यांवर भर देत या महापुरुषांची शिकवण दिली जाणार आहे. मध्यप्रदेशचे शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी म्हटले की, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व वैद्यकीय तत्त्वांचा अंतर्भाव करण्याचा विडा राज्य सरकारने उचलला आहे.

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.