अमरावती : भरधाव टँकरने दुचाकीला धडक,महिला गंभीर

Share This News

तळेगाव दशासर : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. औरंगाबाद- नागपूर सुपर हायवेवरील स्थानिक एका धाब्याजवळ शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात टँकरदेखील उलटला. अमिता व एकनाथ हरगे (रा. वर्धा) हे दाम्पत्य एमएच ३२ एपी १११० क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना एम एच ४० बी एल ०४८१ क्रमांकाच्या टँकरने त्यांना धडक दिली. यात अमिता हरगे (३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पाटील, बिरणजे हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त महिलेला रुग्णवाहिकेतून वर्धा येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. टँकर उलटल्यानंतर चालक पसार झाला. अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.