अमरावती : ३१ जानेवारीपर्यंत निधी न मिळाल्यास नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार

Share This News

पीएम आवास योजनेतील धनादेश प्रलंबित प्रकरणात मंगळवारी चांदूर रेल्वे नगर परिषदला ताला ठोको आंदोलनाचे आयोजन आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आले होते. आंदोलन नगरपालिकेवर पोहचल्यानंतर नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधतांना ३१ जानेवारीपयर्ंत लाभार्थ्यांना निधी न मिळाल्यास नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्‍वासन दिले.
सदर आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेऊन यशस्वी झाले. यात ठाणेदार मगन मेहते यांनी मध्यस्थी करण्यात महत्वपुर्ण भुमिका निभवली. सदर आंदोलनाचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे नेते तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी व माजी न. प. सभापती मेहमुद हुसेन यांनी केले. गोरगरिबांसाठी शासनाकडून विविध योजना काढण्यात येते. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे लाभार्थ्यांपयर्ंत सदर लाभ पोहचत नसल्याचे चित्र आहे. चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा दुसरा धनादेश सात महिन्यानंतरही न मिळाल्याने आम आदमी पार्टीने न. प. कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात ४ जानेवारीला न. प. कार्यालयात झालेल्या बैठकीत चर्चा निष्फळ ठरली. यानंतर ५ जानेवारीला आम आदमी पाटीर्चे सदर आंदोलन लाभार्थ्यांसमवेत करण्याचे नियोजन केले होते. हे आंदोलन गाडगेबाबा मार्केटमधील सी.सी.एन. कार्यालयापासून सुरू झाले. शेकडो लाभार्थी आंदोलनकर्ते नगर परिषदेवर धडकले. लाभार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, नगरपालीका भंगार है, हल्लाबोल हल्लाबोल नगरपालिकेवर हल्लाबोल,

आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा खुर्ची खाली करा, इंकलाब जिंदाबाद आदी घोषणांनी शहर दणाणून गेला होता. आंदोलन नगरपालिकेवर पोहोचताच पोलिसांच्या ताफ्याने त्यांना अडविले. नगरपालिकेला तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने छावणीचे स्वरूप आले होते. ठाणेदार मगन मेहते यांनी सुरूवातीला आंदोलनकर्ते नितीन गवळी व मेहमुद हुसेन यांच्याशी चर्चा केली व नंतर मागणीनुसार नगराध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी व मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांना चर्चेसाठी बाहेर पाचारण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर निधी उपलब्ध होऊन वाटप करण्याचे आश्‍वासन दिले. नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी यांनी आंदोलनाची उग्रता पाहता थेट ३१ जानेवारीपयर्ंत निधी न मिळाल्यास नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे समस्त लाभार्थ्यांसमोर कबूल केले. नगराध्यक्ष यांच्या या वक्तव्यानंतर व चचेर्नंतर ह्या आंदोलनाची सांगता झाली. त्यामुळे आम आदमी पाटीर्चे सदर आंदोलन यशस्वी झाले. या आंदोलनात आप नेते नितीन गवळी, मेहमुद हुसेन, विनोद लहाने, संजय डगवार, चरण जोल्हे, पंकज गुडधे, निलेश कापसे, अण्णा खंडेतीया, शितल बेराड, गजानन चौधरी, संतोष नेवारे, गोपाल मुरायते, पुनम भेंडे, रेश्मा होले, नमता डाफ, मिना कुटेमाटे, सुनंदा होले, करूणा राऊत, छाया होले, ममता होले, प्राजंली बेराड, ममता बोके, चंद्रकला देशमुख, तानाबाई सोनोने, पेठेताई, महेश चांदेकर, निलेश गिरूळकर, मंगेश डाफ, श्रीधर लांडे, भिमराव बेराड, दत्ता नेमाडे, प्रभाकर गोके, मारोती तायडे, प्रकाश गोटले, प्रदीप मेर्शाम, लवकुश खुने, श्रीकृष्ण भगत, प्रशांत ढोले, विनोद भेंडे, पराग बेराड यांसह शेकडो लाभार्थी हजर होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.