अमरावती: परिवार संवाद बैठकीत अनुपस्थितीत असलेल्या पदाधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष नाराज

Share This News

अमरावती, ४ फेब्रुवारी : पक्षविस्तार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत हितगुज व्हावी याकरता राष्ट्रवादी काँग्रेस ने परिवार संवाद अभियान सुरू केलं आहे. त्या निमित्तानं प्रदेशाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी राज्यभर दौरा करत आहेत.आज जयंत पाटील यानी अमरावती व बडनेरा मतदार संघाचा आढावा घेतला असता बैठकीत उपस्थित नसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थिती मध्ये शहरातील अभियंता भवन येथे परिवार संवाद या बेठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र पक्षातली सत्तावीस प्रमुख कार्यकर्त्यांनी या बेठकीला दांडी मारल्याने जयंत पाटील यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली त्यानंतर नाराज झालेल्या पाटलांनी शहर अध्यक्ष यांनी शहर अध्यक्ष यांना हजेरीच घ्याचे आदेश दिले व हजेरी घेतली या जे प्रमुख कार्यकर्ते अनुपस्थित होते त्यावर कारवाईचे संकेत दिले. यावेळी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यानसोबत मनमोकळा संवाद साधला त्यांच्या अडचणी समजवूं घेतल्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा मजबूत करता येईल यबद्दल त्याना माहिती दिली येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिक बळकट करा असे आवाहन  हि त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले या सोबतच प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे काम कसे सुरु ? मतदार संघात वार्ड किती आहे ? बूथ किती आहे ? असे अनेक प्रश्न यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडून विचारण्यात आले मात्र बडनेरा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ ठरले हे विशेष 
 यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,गृहमंत्री अनिल देशमुख महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख,महासचिव संजय खॊडके,जेष्ठ नेत्या सुरेखाताई ठाकरे,गणेश खारकर,शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले ,नितीन पवित्रकार या सह प्रमुख नेते उपस्थित होते. अमरावती व बडनेरा मतदार संघाचा आढावा घेत असतांना जयंत पाटील यांच्या कडे ग्रामीण अध्यक्ष यांच्या विरोधात भरपूर तक्रारी आल्यात ग्रामीण भागात पक्ष संघटन मजबूत करायचे असेल तर अध्यक्ष बदला अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी थेट जयंत पाटलांकडे केली त्यामुळे आता ग्रामीणचे अध्यक्ष यांना डच्चू मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.