भंडारा : विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नसल्याने संतापलेल्या पालकांनी आमदारांसोबत शाळेवर काढला मोर्चा

भंडारा, ४ जानेवारी : जिल्ह्यातील महर्षी विद्या मंदिर यांनी विद्यार्थ्यांनी फीस दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नसल्याने संतापलेल्या पालकांनी आमदारांसोबत शाळेवर काढला मोर्चा  भंडारा जिल्ह्यातील सिबीएससी शाळेत अतिरिक्त पैसे पालकांकडून उकडले जातात व शाळेतील मुख्याध्यापक हे पद शासकीय मान्यता नसताना सुद्धा शाळेत मुख्याध्यापक यांच्या सहीने मुलांना टीसी दिली जाते, त्यामुळे या मुलांच्या टीसी डुप्लिकेट गृहीत धरले जात आहेत, त्यासाठी सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे, व काही पालक या शाळांविरुद्ध मागील १८ दिवसापासून सत्याग्रह आंदोलन करत आहे, तरी सुद्धा महर्षी विद्या मंदिर या शाळेतील मुख्याध्यपिका यांनी विद्यार्थ्यांनी पैसे भरले नाही म्हणून त्यांना परीक्षे पासून वंचित ठेवले आहे, त्यासाठी आज आमदार व पालक यांनी विचारणा करण्यासाठी आपला मोर्चा शाळेवर वळविला असून मुख्याध्यापक यांनी चर्चा करायला तयार नसल्याने पालक व आमदार यांनी मुख्याध्याकांच्या खोली बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे, परीक्षा न दिल्याने एखाद्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलं तर याला जवाबदार कोण राहणार असा सवालही पालकांनी उपस्थित केलं आहे, तर सिबीएससी शाळेतील मनमानी कारभार सुरु असून आगाऊ पैसे उकळले जात असल्याने ते पैसे व्याजासहित पालकांना परत करावे व शाळेंवर प्रशासक नेमणूक करून कारवाही करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिधी यांनी केली आहे, तर परिस्थिती बिकट होत चालली असताना पोलीस प्रशासन यांनी सुद्धा घटनास्तळी धाव घेतली असून मोठा पोलिसांचा फॊजफ़ाटा तैनात करण्यात आलं होत, तर या आंदोलनाची माहिती शिक्षण अधिकारी यांना सुद्धा देण्यात आली असताना उपशिक्षणाधिकारी यांनी मुख्याद्यापक यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केलं असताना मुख्याद्यापक यांनी कुठलीही चर्चा केली नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाही करण्यात येईल अशी माहिती अधिकारी यांनी दिली आहे, तर मुख्याध्यापक यांना या प्रकरणात विचारणा केली असताना त्यांनी सगळे आरोप फेटाळले असून त्यांच्या शाळेला राजकीय लोक टार्गेट करत असल्याचे सांगितले आहे,  भंडारा जिल्ह्यात सिबीएससी शाळेत अनागोंदी कारभार सुरु असून यांच्या हिटलर शाही  विरोधात पालकांनी आता आवाज उठविला  असल्याने आता शिक्षण विभाग काय कारवाही करतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहेे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.