आरोपांविषयी चौकशी करण्याची अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Share This News

मुंबई, २५ मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावरून महाविकास आघाडी मोठ्या अडचणीत सापडली आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत या सर्व प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. याशिवाय ट्विट देखील केले आहे.
संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करावी!
देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे की, राज्य शासनाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना १७ मार्च २०२१ रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर जे आरोप लावलेत त्या आरोपामध्ये काहीही सत्यता नाही. त्यामुळे मी आपणांस विनंती करतो की, त्यांनी जे आरोप लावले आहेत या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करुन ‘दूधका दूध पानीका पानी’ करावे.
चौकशी लावली तर त्याचे स्वागत!
मुख्यमंत्र्यांना पाठवलेले पत्र ट्वीट करत देशमुखांनी म्हटले आहे की, मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.