चिकन-अंडी खाऊन पशुसवर्धन अधिकाऱ्यांनी केला जनजागृतीचा प्रयत्न | Animal husbandry officials tried to create awareness by eating chicken and eggs

अमरावती : बर्ड फ्ल्यु ची भीती टाळण्यासाठी चिकन व्यावसायिकांनी चक्क ‘ चिकन फेस्टिवल ‘ चे आयोजन केले होते. बर्ड फ्ल्यु बाबतच्या अफवांना आळा बसावा आणि अंडे चिकन खाण्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी पशु संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोल्ट्री संचालकांनी स्वतः चिकन आणि अंडी खाऊन जनजागृती केली आहे .
राज्यात आणि जिल्ह्यात बर्ड फ्ल्यु बाबत अफवांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा पशु संवर्धन विभाग आणि अमृता ह्याचेरीज यांच्या संयुक्त विद्यमाने बर्ड फ्लू जनजागृतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन बर्थ डे हॉल येथे  करण्यात आले होते. यावेळी अंडी व चिकनचे विविध पदार्थ अनेक मान्यवरांनी खाऊन ते अन्न पूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला आहे. पशुसंवर्धन विभाग व पोल्ट्रीधारकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूसदृश स्थिती आढळलेली नाही. चिकन-अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्ण सुरक्षित आहे. शिवाय,ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढत रोगाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे उत्कृष्ट अन्न असलेल्या या अन्नाबाबत गैरसमज पसरू नयेत,असे आवाहन पशु संवर्धन आयुक्त गोहोत्रे यांनी केले. जि. प. चे अतिरिक्त सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे,प्रशांत थोरात,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे,अमृता हचरिजचे संचालक डॉ. शरद भारसाकळे यांच्यास विविध पोल्ट्रीधारक यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.