अँटिलिया स्फोटके, हिरेन हत्या प्रकरणी आणखी एका अधिकाऱ्यास अटक

Share This News

मुंबईः अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए ने मुंबई पोलिस दलातील आणखी एका अधिकाऱ्यास शुक्रवारी अटक केली असून या अधिकाऱ्याचा प्रकरणात थेट सहभाग असल्याचे पुरावे आढळून आले आहेत.
या अधिकाऱ्याचे नाव सुनील माने असे असून तो गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. गुरुवारी एनआयए ने माने याची चौकशी केली होती. या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने सचिन वाझे आणि रियाझ काझी या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.