नागपूर : ‘आप’युवा आघाडीचा महापौरांना घेराव

नागपूर, 13 जानेवारी : नागपुरात मंगळवारी नायलॉन मांजाने गळा कापला जाऊन प्रणय ठाकरे नामक तरुणाचा मृत्यू झाला. प्रतिबंधीत मांजाच्या सर्रास विक्रीमुळे हा अपघात घडला असून मांजा पूर्णपणे बंद व्हावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी युवा आघाडीने बुधवारी महापालिकेत जाऊन महापौर आणि मनपा आयुक्तांना निवेदन दिले. या निवेदनानुसार मंगळवारी झालेल्या घटनेत अभियंता प्रणय ठाकरे यांच्या मृत्यूचा आरोप निश्चित करून दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि शहरात नायलॉन मांजावर असलेल्या बंदीचे पालन व शहरात मनपाने जनजागृती अभियान राबवावे. या नंतर आप युवा आघाड़ीने जुनी शुक्रवारी पतंग मार्केट मध्ये नायलॉन मंजा विरुद्ध जनजागृतीकरीता बाइक रॅली केली. आंदोलनात राज्य युवा समिति सदस्य कृतल वेलेकर, नागपुर युवा अद्यक्ष गिरीश तीतरमारे, पियुष आकरे, प्रभात अग्रवाल, ओम आरेकर, आकाश कावळे, विजय धकाते, रोशन डोंगरे, पिंकी बारापात्रे, रजत भोयर, नीरज शर्मा सहभागी झाले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.